The गडविश्व
बीड : येथे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाआहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.
बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावला. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.