खरपुंडी येथील सर्वे क्रमांक ५० ची जमीन सरकार जमा करा

514

– पत्रकार परिषदेतून खरपुंडी वासीयांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली : शहरा लगतच्या खरपुंडी ग्रामपंचायत येथील भु.क्र. ५० येथे शासनाने वहिवाट करून उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेली जमीन लाभार्थ्यांकडून नियमबाह्यरित्या विकत घेऊन ही जमीन भोग वर्ग २ मधून भोग वर्ग १ मध्ये करण्यात आली त्यानंतर ही जमीन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांकडे अर्ज करण्यात आला विशेष म्हणजे या प्रक्रिया पूर्वीच जागा सपाट करून प्लॉट पाडून विक्री करण्यात आली. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या जमिनी घोटाळ्याची संपूर्ण सखोल व वरिष्ठ स्तरावर चौकशी करून या प्रक्रियेत कायदा धाब्यावर बसवून बसविणारे जमिनीचे लाभार्थी , विकत घेणारे व या प्रक्रियेत असलेले दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा खरपुंडी व परिसराच्या गावा गावातील नागरिक विराट मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही
व सदर जमीन सरकार जमा करण्यात यावी अशी मागणी खरपुंडी वासीयांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे.
खरपुंडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या भूमापन क्रमांक ५० २.१० आर जी जमीन ही १९५८ मध्ये आनंदराव जागोबा शेंडे यांच्या कुटुंबाला शासनातर्फे देण्यात आली होती. या जमिनीत शेती करून पिकावर त्याचा उदरनिर्वाह होण्याकरिता सरकारने जमीन दिली पण शेंडे कुटुंबियाकडून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न आजपर्यंत घेण्यात आलेले नाही. जमीन भोग वर्ग-१ करून विक्री करण्यात आली .
खरपुंडी येथील भूमापन क्रमांक ५० ची जागा २.१० आर जी सातबारा नुसार दाखवण्यात आली आहे मात्र ही जागा २.७० पेक्षाही जास्त आहे म्हणून जागेचे प्रशासनाने योग्य ते मोजमाप व चौकशी करून ही जागा शासन जमा करून खरपुंडी ग्रामपंचायतीच्या इतर विकास कामाकरिता द्यावी,
खरपुंडी ग्रामपंचायतला कार्यालयासाठी जागा नसून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत आहे या शाळेची इमारत लहान असून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय शाळेचे क्रीडांगण व इतर विकास कामासाठी ही जागा शासनाने ग्रामपंचायतला द्यावी, याशिवाय शेंडे कुटुंबाने हीच जागा यापूर्वी २००३ मध्ये अमित धात्रक यांना विकल्याचे बयान पत्र उघडकीस आले आहे त्यामुळे ही जागा धात्रक ,घाईत यांच्यासह अनेकांना विकून फसवेगिरी करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा पुरेपूर संशय आहे यामुळे त्या जमीन घोटाळ्याची लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा मोर्चा, धरणे ,उपोषण व लोकशाहीच्या मार्गाने मार्गाने तीव्र आंदोलन करणार असा इशारा खरपुंडी वासीयांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला दिला आहे.
पत्रकार परिषदेला विजय खरवडे, अनुरथ नीलेकर, ज्योत्स्ना म्हशाखेत्री सरपंच, ऋषी नैताम उपसरपंच, दिनेश आकरे , बाळू मेश्राम, वामनराव टिकले , भगवान बुरांडे , रामभाऊ टिकले, रामचंद्र ढोंगे, खरपुंडी, इंदिरानगर, लांझेंडा, माडेतुकुम, इत्यादी ग्रामवासी या पत्रकार परिषदेला हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here