– पोलीसांनी छापा मारून रोडक केली जप्त
The गडविश्व
ता. प्र / धानोरा : जिल्हयातील धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हेटी येथून एका व्यक्तीच्या घरी लाखो रूपयांची रोकड असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी छापा टाकुण लाखो रूपये जप्त केल्याची कारवाई मंगळवार २३ ऑगस्ट रोजी केली. याप्रकरणी साईनाथ कुमरे रा. धानोरा हेटी याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेमुळे धानोरा तालुक्यासह जिल्हयाभरात एकच खळबळ उडाली असुन विविध चर्चाना उधान आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या हेटी येथील साईनाथ कुमरे याच्या घरी लाखोंची रोकड असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुमरे याच्या घरी पोलीसांनी छापा टाकला असता लाखो रूपयांचे घबाड सापडले. सदर रक्कम ही २० लाख रूपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती असून अद्याप पोलीसांनी एकुण रक्कम किती आहे स्पष्ट केले नाही. त्यामुळे रक्कम किती आहे हे सांगता येणार नाही. दरम्यान रात्रो उशिरा पर्यंत करावाई सुरू होती. पोलीसांनी पैसे मोजण्याकरिता बॅंक कर्मचाऱ्यांना बोलाविले होते.
सदर घटनेने मात्र विविध चर्चेला उधान आले असून एवढी मोठी रक्कम एका सर्वसाधारण व्यक्तीकडे आढळून आल्याने धानोरा तालुक्यासह जिल्हयात खळबळ उडाली आहे.