खळबळजनक : बीएसएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

676

– बीएसएफ कॅम्पमध्येच घटना घडल्याने उडाली खळबळ
The गडविश्व
कांकेर : जिल्ह्यातील कोयलीबेडा येथील कामताडा कॅम्पमध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. उज्ज्वल नंदी असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
जवान उज्ज्वल नंदी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील असून ते कांकेर जिल्ह्यातील कोयलीबेडा येथील कामताडा कॅम्पमध्ये तैनात होते. आज सकाळच्या सुमारास अचानक अज्ञात कारणाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून कॅम्पमध्ये उपस्थित असलेले इतर जवान घटनास्थळी पोहोचले असता, जवानाचा मृतदेह खोलीत पडलेला आढळून आला.या घटनेमुळे खळबळ उडाली असून जवानाच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here