खा.अशोक नेते यांनी पिपरटोला येथील जनतेच्या जाणून घेतल्या समस्या

183

The गडविश्व
गडचिरोली, १४ सप्टेंबर : अमिर्झा वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाची दहशत व अनेक इसमाचा वाघाने बळी घेतला या संदर्भात करमटोला धुंडेशिवनी या दौऱ्याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी पिपरटोला येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले.
पिपरटोला येथे अनेक दिवसापासून जनतेच्या समस्या आवासून उभ्या आहेत. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी या गावात योग्य रस्ते नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही या सर्व समस्याची जाणीव जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी दिल्यानंतर लगेचच त्या गावी जाऊन पाहणी करून पिपरटोला गावातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन लवकरच मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी दिले.
यावेळी खा.अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, संपर्कप्रमुख विलास पा. भांडेकर, उपाध्यक्ष अरुण हरडे, सरपंच भावनाताई फुलझेले, प्रीतीताई गेडाम उपसरपंच तसेच गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here