The गडविश्व
भामरागड, २० ऑगस्ट : भामरागडला सातत्याने पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पंचनामे करून पुराने विस्थापित होणारे व्यावसायिक व बेघर होणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पर्यायी जागे बद्दल तातळीने पाठपुरावा करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश खा.अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उपविभागीय अधिकारी भामरागड येथे अधिकाऱ्यांनसमेत खा.अशोक नेते यांनी पूर परिस्थितीचा घेतला आढावा .गडचिरोली जिल्हयात मुसळधार पाऊस पडल्याने भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद होते. याच पार्श्वभूमीवर खा.अशोक नेते यांनी तातडीने भामरागड दौरा केला. यावेळी रस्ते मार्गाची पाहणी केली व त्यानंतर उपविभागीय अधिकारी भामरागड येथे आढावा बैठक घेतले.
प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. प्रत्यक्ष पूर परिस्थिती आढावा घेतल्यानंतर बैठकीमधे पूर बाधितांचा सर्वे करुन तातडीने मदत करावी व पंचनामे सुरु करावे, प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून काम करावे व आपत्तीला सामोरे साठी सज्ज रहावे, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले. या आढावा बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी खा.अशोक नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, रविंद्रजी ओल्लालवार संघटन जि. महामंत्री, विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष, सुनिल विशवास ता.अध्यक्ष, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष, धनंजय पडशाल उपस्थित होते.