– बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
– अपघातात मृत्यू पावलेल्या कांचनपुर येथील इसमाच्या कुटुबियांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत
The गडविश्व
मुलचेरा, १२ ऑक्टोबर : खा.अशोकजी नेते यांनी मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे बैठकीच्या माध्यमातून गावातील विविध समस्या जाणून घेऊन केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना संबंधी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी बैठकीच्या माध्यमातून शांतीग्राम या गावातील समस्या बाबत माहिती जाणून घेतांना आष्टी आलापल्ली या मेन रोडवर शांतीग्राम हे गाव असून शैक्षणिक शाळेकरी मुले -मुली बऱ्याचशा प्रमाणात आहेत. परंतु शांतीग्राम हे गाव मेन रोडवर असूनही बस थांबत नसल्याने शाळेकरी मुला- मुलींना दोन-तीन किलोमीटर पायीच यावे लागते. हि समस्या खासदार अशोक नेते यांना लक्षात आणुन दिल्यानंतर लगेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापक राठोड यांना तात्काळ दूरध्वनीवरून फोन करून शांतीग्राम येथे बस थांबण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच आदिवासी महामंडळ धान खरेदी केंद्र लगाम (बोरी) येथे धान खरेदी चालु असतांना धान्य खरेदी केंद्र महामंडळाकडे बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या बारदान्यांमध्ये धान्याचा काटा करावा लागतो. अशावेळी शेतकऱ्यांना बारदाना सुद्धा परत देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अधिकचा भर्दंड बसत असून हि बाब खासदार अशोक नेते यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेच तुरंत शेतकऱ्यासंबंधी गंभीर विषय घेऊन शेतकऱ्यांची लूट होऊ नये याकरिता तात्काळ धान्य खरेदी महामंडळाचे व्यवस्थापक यांना दूरध्वनीवरून यासंबंधीची गंभीर्याने दखल घ्यावी अशी ताकीद खासदार अशोक नेते यांनी दिली. या समस्यांचे निराकरण होईल असे आश्वासन या प्रसंगी केले.
या बैठकीच्या माध्यमातून खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या कांचनपूर येथील अंजली सुभाष जयधर (३५) वर्ष या महिलेचा अपघाती निधन झाला. यासंबंधीची वार्ता तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांनी खासदार अशोक नेते यांना दिल्यानंतर यासंबंधीची दखल घेऊन अपघातात मृत्यू पावलेल्या कांचनपुर येथील इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देऊन त्यांना याप्रसंगी आर्थिक मदतसुद्धा देण्यात आली.
या प्रसंगी खा.अशोक नेते, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, स्वप्नील वरघ़ंटे प्रदेश सदस्य युवा मोर्चा, प्रकाश दता तालुकाध्यक्ष मुलचेरा, विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष, निखिल गादेवार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, सुभाष गणपती जिल्हा सचिव तसेच अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.