– चिमूर तालुक्यातही मुसळधार पाऊस
The गडविश्व
चिमूर, १० जुलै : तालुक्यातील खडसंगी-मुरपार (तु), मिनझरी जाणाऱ्या मार्गावरील खोडदा नाल्यावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग आज १० जुलै च्या संध्याकाळ पासून बंद असल्याची माहिती आहे.
हवामान विभागाने वर्तविल्या नुसार चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चिमूर तालुक्यातील मुरपार (तू) जाणाऱ्या खोडदा नाल्यावर पूरस्थिती निर्माण झाली असून पुलावरून पाणी वाहत आहे. पूल पूर्णतः क्षतीग्रस्त झालेला असून उंच पूल बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी मुरपार वासीयांनी केली आहे मात्र ही मागणी धूळखात आहे. अशातच आता मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे. त्यामुळे मुरपार (तु) चा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर या पुलावरून पाणी वाहत असल्यास पर्यायी मार्ग म्हणून पायी जाणाऱ्यांकरिता लोखंडी पूल लावण्यात आले आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने त्या पुलावरूनही पाणी असल्याने मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे.
मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास गावाचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो तसेच पूल ठेंगणा व मोडकळीस आल्याने या ठिकाणी नवीन उंच पूलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गाववासीयांकडून होत आहे.
हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी केला असून. अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://twitter.com/gadvishva/status/1546191078247862272?s=09