– काम सुरू असल्याबाबतचे कोणतेही सूचना फलक नाही
The गडविश्व
गडचिरोली : शहरातुन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात नाली बांधकामाचे खोदकाम जेसीबीच्या द्वारे सुरू आहे. मात्र सदर ठिकाणी काम सुरू असल्याबाबतचे कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नाही. मुख्य चौक हे वर्दळीच्या ठिकाण असल्याने दिवसभर या ठिकाणावरून नागरिकांची रेलचेल सुरू असते. सदर ठिकाणी काम सुरू आहे परंतु काम सुरू असल्याबाबतचे कोणतेही सूचना फलक नसल्याने अनुचित घटना किंवा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याची दखल घेऊन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फलक लावणे तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता संबंधित विभागाचा वाहतूक नियंत्रक ठेवण्याची आवश्यकता आहे.