– ३५ हजार रुपयात एक पेंटिंग मुंबईच्या एका चाहत्याने घेऊन रुषालीचा सम्मान वाढवला
The गडविश्व
मुलचेरा, २३ जुलै : मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त जहांगीर आर्ट गॅलरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बेचाळीसाव्या ‘मान्सून आर्ट शो’ ची सुरुवात झाली. हि प्रदर्शनी १८ जुलै पर्यंत सर्वांसाठी खुली होती. प्रदर्शनीत भारतातील निवडक विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा समावेश होता. त्यात नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाची जी.डी. आर्ट अंतिम वर्षांची विद्यार्थिनी कु. रुषाली नरेंद्र उईके हिच्या दोन कलाकृतींचा समावेश होता. तिने दोन्ही कलाकृती वास्तववादी चित्रशैलीमध्ये तयार केल्या होत्या. यात तिच्या कलाकृतीची निवड करण्यात आली आहे. रुषालीच्या कलाकृतीची केवळ प्रदर्शनासाठीच निवड झाली असे नाही तर मुंबईच्या एका चाहत्याने तिचे एक पेंटिंग तब्ब्ल ३५ हजार रुपये किंमतीला विकत घेऊन रुषालीचा सम्मान वाढवला.
रुषाली हि गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर या गावातील रहिवासी असुन विवेकानंदपुर ग्रामपंचायत सदस्य कविता नरेंद्र उईके यांची कन्या आहे. तिच्या या कलाकृतीची आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे बेचाळीसाव्या ‘मान्सून आर्ट शो’ मध्ये निवड झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
#अभिमानास्पद ! #गडचिरोलीच्या रुषाली #उईकेच्या कलाकृतीची आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे बेचाळीसाव्या 'मान्सून आर्ट शो' मध्ये निवड
-३५ हजार रुपयात एक पेंटिंग मुंबईच्या एका चाहत्याने घेऊन रुषालीचा सम्मान वाढवला#rushali_uikey@gadvishva@InfoGadchiroli pic.twitter.com/lF7TQXSYWy— THE GADVISHVA (@gadvishva) July 24, 2022
रुषालीचे बालपणीचे शिक्षण मुलचेरा तालुक्यात झाले. आजच युग आधुनिक युग आहे. सर्वांचे घरचे स्वप्न असतात आपले मुलं उच्च शिक्षण घ्यावे या मुळे त्यांना तांत्रिक शिक्षण, आरोग्य शिक्षण असे विविध शिक्षणाकडे पालक आपल्या पाल्याना वळवतात. मात्र या उईके घराण्यात अस घडले नाही. एकुलती एक मुलगी रुषालीला चित्रकलेची आवड होती. त्यामुळे आई कविता उईके हिने आपल्या मुलीच्या आवडी प्रमाने तिला चित्रकला महाविद्यालयात प्रवेश करून दिले. ती नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात पाच वर्षांपासून चित्रकलेचे शिक्षण घेत आहे. तिच्या चित्रांमध्ये ग्रामीण जीवनातील प्रसंग प्रामुख्याने बघावयास मिळतात. महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने चित्रकृतीला मूर्तरूप दिले. रुषालीचे कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून तसेच जिल्हावासियांकडून अभिनंदन होत आहे.
https://www.instagram.com/p/CgYij6htNQA/?igshid=MDJmNzVkMjY=