गडचिरोलीतील डिजिटल तापमान फलक बनली शोभेची वस्तू

338

– अनेक दिवसांपासून आहे नादुरुस्त
The गडविश्व
गडचिरोली : राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या उष्णतेमुळे लाही लाही होत आहे. तापमान ४० अंशाच्या जवळपास पोहचत आहे तर कधी पार सुद्धा होत आहे. अश्यातच गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक पोलीस चौकीवर काही वर्षांपूर्वी डिजिटल तापमान फलक लावले होते. या तापमान फलकामध्ये तापमान नेमके किती आहे हे कळत होते मात्र काही महिन्यांपासून हे डिजिटल तापमान फलक बंद असल्याने शहरातील तापमान किती आहे हे पाहण्यास अडचण होत आहे. हे तापमान फलक सध्या शोभेची वस्तूच झाली आहे.
लाखो रुपये खर्च करून हे तापमान फलक लावण्यात आले होते यामुळे येथील नागरिकांना दैनंदिन तापमानाची माहिती मिळत होती. तसेच तापमानाची नोंद घेण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमनुकही करण्यात आली होती अशी माहिती आहे. मात्र हे डिजिटल तापमान फलक काही महिन्यांपासून बंद स्थितीत असल्याने शहराचे तापमान नेमके किती आहे याची माहिती होत नाही आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त तापमान फलक दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here