गडचिरोलीत गोवंश तस्करीचा डाव उधळला ; ३४ गोवंशांना जीवनदान, चार आरोपींना अटक

933

– ट्रकसह ११ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑगस्ट : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ट्रकमधून अवैध गोवंश तस्करीचा डाव उधळून तस्करखोरांच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून ३४ गोवंशांना जीवनदान देत ट्रकसह ११ लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी ट्रक चालकासह तिघांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाईमुळे अवैध गोतस्करांचे धाबे दणाणले आहे.
ट्रकचालक सुरेंद्र सरदार सिंग (४८) रा. कमालचौक लक्षरीबाग नागपुर ता. जि. नागपुर व त्याचे सहकारी विकास संतोष यादव (२७) व्यवसाय मजुरी रा. हदकुसपारा ता उदई जि. दुर्ग (छ. ग. राज्य ), भोला जिवन गिरी (२६) व्यवसाय मजुरी रा. आदर्शनगर ता. उदई जि. दुर्ग (छ. ग. राज्य ), नितीश योगेंद्र यादव (३१) व्यवसाय मजुरी रा. भवानी बिगार ता. करायपरसोराय जि. नालंदा (बिहार राज्य) असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहीतीनुसार, एमएच ४० बि. एल. २७०५ क्रमांकाचा दहा चाकी ट्रक छतीसगड सिमावर्ती भागातुन धानोरा मार्गे गडचिरोली येथून चंद्रपुर कडे अवैधरित्या गोवंश वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे धानोरा ते गडचिरोली मार्गावर सापळा रचला असता सावरगाव येथे भरधाव येणाऱ्या दहा चाकी ट्रक ला थांबवून झडती घेतली असता त्यात दाटीवाटीने, कोंबून, निर्दयीपणे गाय, बैल, गोरे असे एकूण ३५ गोवंश आढळून आले त्यापैकी एक मृतावस्थेत आढळून आला. सदर गोवंशांची किंमत १ लाख १२ हजार २०० रुपये तर वाहतुकीकरिता वापरण्यात आलेला दाहाचाकी ट्रक किंमत १० लाख रुपये असा एकूण ११ लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकासह तीन साथीदारांना ताब्यात घेऊन गडचिरोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेलय गोवंशांची पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली व सुरक्षीतेच्या दृष्टीने तात्पुरते गोवंश यांना लाझेडा येथील कोडवाडयात ठेवुन लागलीच भारतीय गौरक्षण, गो-शाळा संस्था (अध्यक्ष) तळोधी (बालापुर) शाखा गोविंदपुर ता. जि. चंद्रपुर येथे रवाना करण्यात आले आहे.
सदर कारवाही पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, मसपोनि ,पुनम गोरे, पोहवा प्रमोद वाळके, पोहवा खेमराज नवघरे, पोहवा चंद्रभान मडावी, चालक धोटे, एकनाथ धोटे या पोलीस पथकांनी पार पाडली. अधिक तपास वरीष्टांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि संघमित्रा बांबोडे या करीत आहेत.
अशा प्रकारे पोलीस स्टेशन परीसरात कत्तलीकरीता निर्दयतेने दाटीवाटीने कोंबुन पायास दोरी बांधुन अवैध जनावराची वाहतुक संबंधाने किवा अवैध धंदयाबाबत माहिती मिळाल्यास गडचिरोली पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन गडचिरोली पोलीसांमार्फ़त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here