The गडविश्व
गडचिरोली, २१ नोव्हेंबर : येथील शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या गडचिरोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. ओंकार रामचंद्र अंबपकर रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा जि.प.गडचिरोली येथे वरिष्ठ सहायक (लेखा) नोकरीवर असून त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहे. आरोपी हा कोणत्या न कोणत्या कारणाने पीडितेस कार्यालयात बोलावून नेहमीच विनयभंग करीत होता व पीडितेने विरोध केला असता नोकरीवरून काढण्याची धमकी देत होता. या प्रकरणी पीडितेने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेत तात्काळ अटक केली
पुढील तपास गडचिरोली शहर पोलीस करीत आहे.
#gadchirolinews #crimenews #police #zpgadchiroli #onkar #ambapkar #onkarambapkar