– महाविद्यालयातील विविध समस्याना घेऊन अभाविप आक्रमक
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : अभाविप ने महाविद्यालयातील विविध समस्याना घेऊन आक्रमक पवित्रा घेत स्थानिक विज्ञान महाविद्यातयात काल ३ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन केले व प्राचार्या हेमलता वानखेडे यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे हे केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे एकमेव असे छात्र संघटन असून विद्यार्थ्यांच्या तळागाळातील समस्याना वाचा फोडून सोडविण्याचे कार्य करीत आहे. काल ३ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील विज्ञान महाविद्यातयाततील विविध समस्यांना घेऊन अक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलन केले व मागण्या करण्यात आल्या.
महाविद्यालयातील वसतिगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागणारे जीवनाउपयोगी साहित्य हे गहाळ झाले आहे याची चौकशी करावी व ज्या इसमाने हि चोरी केली त्यावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी, शासकीय विज्ञान महाविद्यालय असल्याने शासनाकडून भरमसाठ निधी क्रीडा साहित्यासाठी दिला जात असूनसुद्धा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य नाही ते साहित्य उपलब्ध करून द्यावे, महाविद्यालयात व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिम सुरू करण्यात यावे, जिम चे अत्याधुनिक साहित्य कुठे व कसे गहाळ झाले माहिती द्यावी, शासनाकडून महाविद्यालयातील क्रीडांगण तयार करण्याकरिता मिळालेला निधी कुठे वापरला व क्रीडांगण का तयार केले नाही याची माहिती द्यावी, महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्स हा कोर्स आहे पण शिकवण्यासाठी कॉम्पुटर उपलब्ध नाही सुरू असलेले कंप्युटर कुठे गहाळ झालेत याची माहिती द्यावी,
व बंद असलेले कॉम्प्युटर आता पर्यँत का सुरू करण्यात आले नाहीत, केमिस्ट्री विषयाचे प्रात्याक्षिक घेण्यासाठी केमिकल उपलब्ध करून घ्यावे व आता पर्यँत का उपलब्ध करून दिले नाहीत या संदर्भात माहिती द्यावी, प्राणिशास्त्र विभागासाठी २ कोटी रुपयांचे साहित्य घेतले त्याची माहिती द्यावी, विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी चे स्वच्छतागृह स्वच्छ करावे व तिथे पाण्याची व्यवस्था करावी, वसतिगृहातील खोल्याना खिडकी व पडदे बसवण्यात यावे, विद्यार्थिनीच्या स्वछतागृहाबाहेर सॅनिटरी मशीन लावण्यात यावी. अशा मागण्या निवेदनातून करण्यात आले असून निवेदन प्राचार्या हेमलता वानखेडे यांना देण्यात आले.
मागण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण न केल्यास अभाविप तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी शक्ती केराम यांनी दिला.
यावेळी अभाविप गडचिरोली नगर मंत्री अभिलाष कुंनघाडकर, चेतन कोलते, हिरालाल नूरती, प्रणय म्हस्के, जयेश ठाकरे, राहुल श्यामकुवर, शक्ती केराम, गायत्री सेलोटे, प्राची अर्जुंकर, कांचन आत्राम, प्रियांशु,येरमलवार, हितेश गेडाम , खुशिया बाबणवडे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.