– कुरखेडा पोलिसांची कारवाई, जनावरांसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील पुराडा मार्गे अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करीत असतांना कुरखेडा उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांच्या नेतृत्वात पोलीसांनी गोठणगाव नाक्याजवळ शनिवारी रात्रोच्या सुमारास सापळा रचून कारवाई करत ३१ गोवंशाची सुटका केली आहे. याप्रकरणी आरोपीविरूध्द कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यावेळी जनांवरांसह ९ लाख ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गडचिरेाली जिंल्हयात गोवंश तस्करीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक कारवाई करूनही गोवंश तस्कर कारवाईला न जुमानता नवीन मार्ग काढत गोवंशांची तस्करी करीत आहे. पुराडा मार्गे गोवंश जनावरे कत्तीलीसाठी जात असल्याची माहिती कुरखेडा उपविभागीय पोलीस कार्यालयाला प्राप्त झाली असता माहितीच्या आधारे शनिवारी रात्रोच्या सुमारास गोठणगाव नाक्याजवळ सापळर रचला. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एम.एच.बी.जी ९१४३ क्रमांकाच्या ट्रकला पोलीसांनी अडविले. यावेळी ट्रक चालकाने जनावरे भरलेला ट्रक सोडून पळ काढला. पोलीसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत ३१ जनावरे आढळून आली. याप्रकरणी अवैध जनावरांसह ट्रक असा ९ लाख ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी ट्रकमधील ३१ जनावरांमध्ये एक गोवंश मृतावस्थेत आढळून आले तर इतर अनेक जनावरे गंभीररित्या जखमी असल्याचे कळते.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी साहिल झरकर यांच्यासह राकेश पालकृतीवार, बाबुराव पुडो, जितेंद्र कोवाची, मनोज राउत यांनी केली. यातील अरोपी विरूध्द कुरखेडा पोलीस ठाण्यात विविध कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.