गडचिरोली : अहेरीचे पोलीस निरीक्षक अडकले एसीबीच्या जाळ्यात

1788

– एक लाखांची लाच स्विकारतांना अटक
The गडविश्व
गडचिरोली, ५ सप्टेंबर : वाहतुक ठेकेदाराला नियमित वाहनांची वाहतुक करण्यासाठी व असलेल्या गुन्हयात कोणतीही कारवाई न करण्यासाठी १ लाख रूपयांची लाच स्विकारतांना अहेरी येथील पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केले आहे. सदर कारवाईने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यातील तक्रारदार हे नागेपल्ली येथील रहिवासी असून तो गौण खणिजाची ट्रकव्दारे वाहतुक करतो. वाहनाची विनाअडथळा नियमित वाहतुक करू देण्यासाठी व असलेल्या गुन्हयात कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी १ लाख रूपायांची मागणी केली. मात्र तक्रारदारास सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता पोलीस निरीक्षक गव्हाणे हे आज ५ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात शासकीय वाहनात १ लाख रूपये लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाईने गडचिरोली पोलीस दलात एकचा खळबळ उडाली असून अटकर करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक गव्हाणे यांच्या घरी पुन्हा किती घबाड आढळून येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here