गडचिरोली : आज भव्य आदिवासी युवक-युवती व आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

527

गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोर खिडकी व मैत्री परिवार संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यामाने
– शहरातील अभिनव लॉन येथे पार पडणार विवाह सोहळा

The गडविश्व
गडचिरोली : पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी युवक-युवती व आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांसाठी एक अभूतपुर्व भव्य सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन आज १३ मार्च रोजी करण्यात आले आहे. सदर भव्य सामुहिक विवाह सोहळा गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे. यात १६ आत्मसमर्पीत नक्षल जोेडप्यांसह ११७ आदिवासी युवक-युवती विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हयातील आदिवासी समाजातील आर्थिकदृष्टया कमकुवत आणि आत्मसमर्पीत नक्षली युवक युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या तसेच नागरिकांच्या मनातील भय दूर करून त्यांना मोकळा श्वास घेता यावा याकरिता पोलीस विभाग सातत्याने प्रयत्न करित आहे.
या भव्य सामुहिक विवाह सोहळयाचे उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. विवाह सोहळ्याला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गंगाधर ढगे उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here