– दोन वाघांच्या झुंझीत मृत्यू झाल्याचा संशय
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील आलपल्ली वनपरिक्षेत्रात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर मृतक वाघ हा अवघ्या दिड वर्षाचा नर आहे. वाघाचा मृत्यू जंगलातील वर्चस्वाच्या झालेल्या झुंझीत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना काल शनीवारी घडल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचा मृत्यू दोन वाघाच्या झूझीत झाला असावा अशी शक्यताा वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती कळू शकणार आहे.