The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : स्थानिक इंदिरा गांधी महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२२-२३ करीता राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना १२ ऑक्टोबर २०२२ ला करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विशाल भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रमोद साहरे, प्रा. ठाकरे, प्रा. बुरले मॅडम, प्रा. येमुलवार मॅडम उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना प्रा. भांडेकर यांनी सांगितले की अभ्यास मंडळ म्हणजे काय ? अभ्यास मंडळामध्ये विद्यार्थ्यांना कोणते कार्य करावे लागतात याविषयी मार्गदर्शन केले.
या अभ्यास मंडळाच्या कार्यकारणीमध्ये अखिल कुमदवर (अध्यक्ष), दिपक खेमदेव अभारे (उपाध्यक्ष), रेश्मा दिगंबर फाले (सचिव), अश्विनी प्रेमानंद शेंडे (सहसचिव), रोशनी रामदास नरोटे(कोषाध्यक्ष), अमृता दिनकर कोवाची (सहकोषध्यक्ष), साक्षी जेंगटे, कल्याणी जराते, नरेश मनोहर हिचामी यांची समिती गठित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. हर्षल गेडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय मोहूर्ले यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य केले.