The गडविश्व
गडचिरोली, १६ नोव्हेंबर : नाशिक येथे १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत एकलव्य मॉडल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी गेवर्धा ( स्थित गडचिरोली ) येथील खेळाडूनीं घवघवीत यश मिळविले आहे.
या क्रीडास्पर्धेत वैयक्तिक प्रकारात नेमबाजी खेळामध्ये यश नरोटे (एकलव्य स्कूल गेवर्धा) याने प्रथम क्रमाक सह सुवर्ण पदक पटकाविले. याच क्रीडा प्रकारात तमस मडावी (एकलव्य स्कूल चामोर्शी) याने द्वितीय क्रमांक सह रौप्य पदक पटकावले. सांधिक खेळ प्रकारात (कबडी अंडर १९ मुली) गटामधे एकलव्य स्कूल चामोर्शी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला व (कबड्डी अंडर १९ मुले) एकलव्य चामोर्शी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक ए. पी. गौतम, ए. व्ही. पिल्लेवान यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शाळेचे प्राचार्य एस. के. लांडे व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.