– आरोपी विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरू असेलेल्या एकलव्य मॉडेल स्कुलमधील अल्पयीन आदिवासी विद्यार्थीनीवर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याने लैगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवार ५ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी आरोपीस गडचिरोली पोलीसांनी अटक करून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोष यांनी निलंबित केले आहे . रत्नाकर पिट्टलवार (५७) रा. पारडी पो.कवठी ता. सावली जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पिडीता ही नेहमीप्रमाणे नाष्टा करण्याकरिता डायनिंग रूम मध्ये गेली व नाष्टा करून वसतीगृहात परतत असतांना एकटी असल्याचा फायदा घेवून आरोपीने तिच्यावर लैगीक अत्याचार केला. पिडीतेने सर्व हकिकत शाळेतील अधीक्षीका यांना सांगीतली असता तात्काळ अधीक्षीका यांनी मुख्याध्यापक व पोलीसांनी माहिती दिली. मुख्याध्यापक यांनी सदर प्रकार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. पोलीसांनी आरोपीस अटक करून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणी आरोपीला निलंबित केले आहे. सदर घटनेमुळे मात्र पालक वर्गात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
एकलव्य मॉडेल स्कुल आधीच विविध समस्येच्या कचाट्यात सापडली असून काल झालेल्या घटनेने मात्र पुन्हा एकदा नवी समस्या उत्पन्न झाली आहे. चामोर्शी व गेवर्धा येथे एकलव्य मॉडेल स्कुल देण्यात आली आहे. मात्र इमारती अभावी सदर शाळेचे वर्ग शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत भरविण्यात येत आहे. चामोर्शी व गेवर्धा या दोन्ही शाळेचे जवळपास ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेचे विद्यार्थी असे अंदाजे ११०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. हजारच्या वर विद्यार्थी असतांनाही शाळेत कुठेही अदयाप सिसिटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत ही एक महत्वाची बाब असून एकीकडे शासन दुकानात सिसिटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे असे म्हणतो तर एकीकडे शासकीय शाळेतच सिसिटीव्ही कॅमेरे नाहीत. याबाबत वरिष्ठांणी विशेष लक्ष देवून सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
सदर प्रकार हा घृणास्पद आहे. असा प्रकार घडणे अपेक्षित नव्हते. एवढया मोठया संख्येने विद्यार्थी असल्याने शाळा परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे असणे आवश्य आहे. असा प्रकार पुन्हा घडु नये याकरिता सातत्याने नजर ठेवल्या जाईल.
-संजीव इलमे
मुख्याध्यापक, एकलव्य मॉडेल स्कुल
सदर प्रकरणी आरोपीस निलंबित केले असून पुढील कारवाई पोलीस प्रशासन करीत आहे. शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात वरिष्ठांपर्यंत आमच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.
-घोष
आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, गडचिरोली
आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दिवसाचा पीसीआर देऊन आता १५ दिवसाचा एमसीआर देण्यात आला आहे.
-प्रणिल गील्डा
उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली
©©©©©©©
(gadchiroli news eklavya model school english ashram school posco )