गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

316

The गडविश्व
गडचिरोली : एकीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलगीकरणाकरिता असलेले लढा सुरु असतांना गडचिरोली जिल्हयातुन दुःखद घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अहेरी आगारातील एका स्वच्छक कर्मचाऱ्याचा २८ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याची माहिती आहे. राजेंद्र उंदरे असे सदर दुःखद निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मृतक राजेंद्र उंदरे हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते बस चालवण्यास योग्य नव्हते. त्यामुळे त्यांना स्वछक कर्मचारी म्हणून कामावर रुजू करण्यात आले होते. २८ जानेवारी रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने एसटी महामंडळाच्या समस्त कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला आपल्या कमावत्या व्यक्तीच्या निधनाने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असल्याचे चित्र दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here