गडचिरोली : कुरखेडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्षपदी अनिता बोरकर यांची निवड

545

– जिल्हा समन्वयक किरण पांडव व जिल्ह्यातील शिवसैनीकांच्या नियोजनबध्द व्यवस्थापनेमुळे फडकला भगवा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवड दोन टप्यात होणार होती. आज पहिल्या टप्यातील निवड पार पडली. यात कुरखेडा नगरपंचायतीवर शिवसेना-काँग्रेस ची सत्ता स्थापन झाली असून नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अनिता बोरकर यांची निवड करण्यात आली आहे
या निवडीचे श्रेय पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा समन्वयक किरण पांडव व जिल्ह्यातील शिवसैनिकांना देण्यात येत असून शिवसैनीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपचे ९, शिवेसना ५ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले होते. यात भाजपचे पारडे जड होते त्यामुळे आता भाजपाचीच सत्ता स्थापन होण्याचे चित्र दिसत होते. मात्र ऐनवेळी भाजपच्या नगरसेविका जयश्री रासकर यांनी बंडखोरी करत शिवसेना-काँग्रेसच्या गोट्यात प्रवेश केला. त्यामुळे शिवसनेना-काँग्रेस युती संख्येत भर पडली आणि शिवसेना आणि काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. व शिवसेनेच्या नगरसेविकेची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडुन आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे चाणक्य व शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या नियोजनबध्द समीकरणामुळे व जिल्ह्यातील शिवसैनीकांच्या व्यवस्थापनेमुळे नगर पंचायत मध्ये सत्ता काबीज केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेचे समस्त पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे. शेती, आरोग्य, दळणवळण, वीज पुरवठा, रोजगार या क्षेत्रात शिंदे यांनी जिल्हापातळीवर केलेल्या विकासकामांमुळेच शिवसेनेला हे मोठं यश मिळाले आहे. जिल्हा समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मेहनातीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. ‘गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून केलेल्या कामाला जनतेने दिलेली ही पोचपावती असून गडचिरोली जिल्ह्याला मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे’ मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here