गडचिरोली : केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांच्या संकल्पनेतून रांगी केंद्र डिजिटल व पेपरलेस होण्याच्या मार्गावर

523

– मुख्याध्यापकांना होणार अधिक सोयीचे
The गडविश्व
गडचिरोली, १३ नोव्हेंबर : धानोरा तालुक्यातील रांगी केंद्र डिजिटल होण्याच्या मार्गावर असून केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात केंद्राने डिजिटल क्षेत्रात भरारी घेण्याचे निश्चित केलेले आहे. शासन स्तरावरून विविध प्रपत्रांमध्ये विविध विविध प्रकारची माहिती मागविली जाते त्याकरिता वेळोवेळी सभेचे आयोजन करून माहिती सांगितली जाते. सोबतच माहितीचे प्रपत्र, त्यात माहिती भरणे याकरिता शाळेतील मुख्याध्यापकांचा बराच वेळ जातो व गुणवत्तेवर परिणाम होतो आणि पालकांच्याही रोशाला सामोरे जावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांनी डिजिटल केंद्र ही संकल्पना राबविली आहे. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कृतीयुक्त प्रशिक्षण घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व डिजिटल संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणायला सुरुवात केलेली आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल संकल्पना केंद्रात राबवली जात असल्याने कोणत्याही माहितीबद्दल प्रपत्र केंद्रस्तरावरून स्प्रेडशीटच्या माध्यमातून पाठविली जाते व मुख्याध्यापक त्याच स्प्रेडच्या माध्यमातून माहिती भरत असल्याने माहिती अगदी क्षणात संग्रहित केली जाते. सोबतच माहिती ही स्वतः डाऊनलोड करता येत असल्याने शाळेला स्वतंत्र प्रपत्र तयार करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे वेळेची बचत होते. अगदी याच पद्धतीने फोटो व इतर माहिती अपलोड करण्याची सुविधा असल्याने माहितीचे एकत्रिकीकरण अतिशय जलद व सभेचा वेळ सुद्धा, सभा ही सुद्धा फक्त ऑनलाईन स्वरूपात आणि शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त घेत असल्याने शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना शाळेत अध्यापनाकरिता पुरेसा वेळ मिळत आहे व गुणवत्ता वाढीवर सुद्धा याचा परिणाम होऊन गुणवत्ता वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सर्व माहिती ही ऑनलाइन स्वरूपात असल्याने अतिशय कमी वेळात व योग्य प्रकारे सहज उपलब्ध होत असल्याने शिक्षकावरचा भार, मानसिक तणाव हे सुद्धा कमी होत आहे. एक प्रकारे रांगी केंद्राने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचे संकलन करण्याची डिजिटल संकल्पना अवलंबल्याने केंद्राचे कार्य उत्तम व जलद गतीने होण्यासोबतच पेपरलेस होऊन केंद्रातील सर्व शाळेवरचे सनियंत्रण सहजतेने व योग्य रीतीने धानोरा तालुक्यातील रांगी केंद्राचा आदर्श इतर शाळांनी किंवा केंद्रांनी घेऊन माहितीचे संकलन जलद गतीने करावे व शिक्षकांच्या अतिरिक्त करावी असा हा एक प्रयत्न आहे.

#gadchiroli #rangi #gadchirolinews #paperless #devendraanjewar #school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here