– महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषदेतून मागणी
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरिता आरोग्यसेवकांची 100 टक्के पदभरती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
आरोग्यसेवकांची 50 टक्के पदे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र एकुण रिक्त जागांपैकी केवळ 25 टक्केच जागा भरण्यात आल्या तर काही जागा रिक्त आहे. मात्र राज्यासह जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुभाव बघता तसेच पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रान आल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक भार पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता आरोग्यसेवकपदासाठी जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोजी जिल्हयात 2015 साली 839 हंगामी क्षेत्र कर्मचारी घेण्यात आले. त्यापैकी बहुतेक उमेदवार हे गुणवत्ता यादी आहेत. मात्र गडचिरोली जिल्हात केवळ 19 जागा होत्या. तसेच राज्यस्तरीय यादी लावल्यास गूणवत्ताधारक युवकांना नाकरी मिळेल अशी मागणीही पंत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी शाखा गडचिरोली जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद अजीज शेख, उपाध्यक्ष ज्ञानदीप गलबले, कोषाध्यक्ष सुरज बाबनवाडे, सचिव मिलींद खेवले, कुणाल रायपुरे, मुक्तेश्वर गावतुरे, अजय पातेवार, चेतन जेंगठे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश बुरांडे, धमेंद्र गोवर्धन, सुरेश सिडाम यांच्यासह हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.