The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑगस्ट : सारस्वत बहुउद्देशीय संस्था गडचिरोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली तथा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन क्रीडा प्रबोधिनी गडचिरोली येथे करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घ्यायचे आहे त्या खेळाडूंनी संस्थेचे सचिव पंकज मडावी 8552815829, 9404237952 या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदवावे असे आवाहन अयोजकांकडून करण्यात आले आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या वजन गटात व वयोगटा नुसार घेण्यात येणार असून स्पर्धेला येताना वयाचा पुरावा आणणे अनिवार्य आहे.