– स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचा पुढाकार
THE गडविश्व
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने सोमवार ३ जानेवारी २०२२ रोजी खुर्सा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसा येथे करण्यात आले आहे.
स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीने जिल्ह्यांतर्गत आणि जिल्हयाबाहेर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेऊन गरजूंना तात्काळ नि:शुल्क रक्ताची मदत उपलब्ध करून देत आहे.
– मानव एक सामाजातील महत्वपूर्ण घटक आहे. म्हणून मानवाने समाजाला कोणती कोणती देण दिली पाहिजे. तसेच रक्तदान एक समाजिक बांधिलकी आहे. त्यानुषंगाने युवा वर्गाने स्वत: पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन आकाश पि. अंबोरकर यांनी केले आहे.
रक्तदान नोंदणीकरिता छोटू लडके (मो. नं. 9422171810), लखन देशमुख (मो. नं 9403439140), आशिष आंबोरकर (मो. नं 7588675399), दुर्योधन कठाने (मो. नं 6372036696), गणेश सोनटक्के (मो. नं 9404853895), अर्जुन कोरेटी (मो. नं 8459928621), राहुल मेश्राम (मो. नं 8275583107) आकाश आंबोरकर (मो. नं 8080759718) यांच्यासोबत संपर्क करावे.