– चारचाकी वाहनही जप्त
The गडविश्व
कुरखेडा, २७ ऑगस्ट : येथील गोठणगाव नाक्यावर गांजाची तस्करी करणाऱ्यांच्या कुरखेडा पोलीसांनी मुसक्या आवळत दोन आरोपींना जेरबंद केल्याची कारवाई बुधवार २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. या प्रकरणी दोन चुंगडीत असलेला २ लाख ४६ हजारांच्या गांजासह चारचाकी जप्त करण्यात आले आहे.
वैभव नरेश धुळस (३०), अनिरूध्द देवानंद कांबळे (३१) दोन्ही रा. सिंगोरी पो. मारोडी ता. मौदा जि. नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मालेवाडा परिसरातून कुरखेडा मार्ग गांजाची तस्करी होणार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्रोच्या सुमारास गोठणगाव नाक्यावर उपविभागीय पोलीस अधीकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीसांनी सापळा रचला असता मालेवाडा मार्गाने येणाऱ्या एम.एच.४६ ए.एल. ४३२३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबवित झडती घेतली असता वाहनात दोन चुंगडीत २४ किलो ७०० ग्रम गांजा आढळून आला. सदर गांजाची किंमत २ लाख ४७ हजार ऐवढी असून गांजासह चारचाकी वाहन, २ मोबाईल असा एकुण ६ लाख १९ हजारांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूध्द विविध कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व गुरवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहे. सदर करावाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
