गडचिरोली : जंगल परिसरात आढळला इसमाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह

1316

The गडविश्व
गडचिरोली, ९ नोव्हेंबर : नेहमीप्रमाणे स्वमालकीची गुरे जंगल परिसरात चारण्याकरिता गेलेल्या ६० वर्षीय इसमाचा आज ९ नोव्हेंबर रोजी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दशरथ उंदरू कुनघाडकर रा.भाडभीडी (मो ) ता.चामोर्शी जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाडभीडी (मो ) येथील दशरथ उंदरू कुनघाडकर हे काल मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रांतर्गत मुरमुरी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ४ मध्ये गुरे चारण्याकरिता गेले होते. दरम्यान सायंकाळ झाली असता केवळ गुरे घरी आले मात्र दशरथ कुनघाडकर हे न परतल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही मिळून आले नाही. दुसऱ्या दिवशी आज बुधवार ९ नोव्हेंबर रोजी पुन्हा सकाळच्या सुमारास जंगल परिसरात शोधाशोध केली असता प्रथम एक गाय मृतावस्थेत आढळून आली व त्यानंतर काही अंतरावरच अर्धवट खाल्लेले छिन्नविच्छिन्न अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळून आले. चेहरा आणि कपड्यांवरून ते दशरथ कुनघाडकर असल्याची ओळख पटविण्यात आली. गाय आणि दशरथ कुनघाडकर यांच्या मृतदेहावरून वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार करून भक्ष केल्याचे उघडकीस आले.

घटनेची माहिती वनविभाग व चामोर्शी पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे आपल्या पथकासह राजकुमार तसेच वनपिरिक्षेत्राधिकरी राहुल तांबरे, जोगना उपक्षेत्राचे क्षेत्र सहायक धाईत, कुनघाडा उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय एस. एम. मडावी, वनरक्षक एन. बी. गोटा आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

वाघाने इसमाला ठार केल्याची तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जात असून. वनविभागाने घटना घडली त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असून ट्रॅप कॅमेरे वाघाची हालचाल व ओळख टिपणार आहे. तसेच नागरिकांना सदर जंगल परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

#gadchirolinews #chamorshi # tigerattack #dethbody #forest #gadchiroliforest

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here