गडचिरोली जिल्हयातील आतापर्यंत ५० शिक्षकांनी टिईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे पडताडणी करीता केले सादर

219

– टिईटी प्रमाणपत्र पुणे येथे पडताडणीकरीता पाठविल्याची माहिती
– जिल्ह्यात एकूण शिक्षकांची संख्या ४५००

The गडविश्व
गडचिरोली : राज्यात टिईटी घोटाळा उघडकीस आल्याने बनावट प्रमाणपत्राव्दारे नोकरी करणाऱ्या शिक्षकांचा शोध राज्यभरात सुरू असून याचे पडसाद गडचिरोल जिल्यातही पडतांना दिसत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ५० शिक्षकांनी पुढाकार घेत टिईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. तर जिल्हयातील बहुतांश खासगी संस्थावरील अनेक शिक्षकांनी अजूनही टिईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर केले नसल्याचे कळते.
सन २०१३ नंतर जिल्हा परिषद किंवा खासगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू झालेल्या सर्व उमेदवारांना टिईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्य करण्यात आली. दरम्यान टिईटी परीक्षेचा खोटाळा उजेडात आल्याने बोगस टिईटी प्रमाणपत्र धारकांवर टांगती तरवार उभी झाली आहे. टिईटी घोटाळा उजेडात आल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.
२०१३ नंतर प्राथमिक शिक्षक म्हणून अनेक शिक्षक रूजू झाले. या शिक्षकांनी टिईटी परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले मात्र टिईटी घोटाळा उजेडात आल्याने आता त्यांचे प्रमाणपत्र जमा करून प्रमाणपत्रांची तपासणी सुरू आहे. तर पडताडणी दरम्यान प्रमाणपत्र बोगस निघाल्यास नोकरी धोक्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हयात एकुण ४५०० शिक्षक कार्यरत आहेत. त्यात पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या ४ हजार शिक्षकांचा समावेश आहे तर उर्वरित ५०० शिक्षक सहावि ते आठवी पर्यंत शिक्षण देत आहे. यामधून आतापर्यंत केवळ ५० शिक्षकांनी टिईटी प्रमाणत्र शिक्षण विभागाकडे तपासणीकरीता सादर केले असून यात जिल्हा परिषद शाळांचे ४९ व खासगी शाळेच्या १ अशा ५० शिक्षकांचा समावेश आहे. या ५० शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर केले असून प्रमाणपत्र पुणे येथे पडताडणी करीता पाठविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here