गडचिरोली जिल्हयातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर : बघा एका क्लिक वर

415

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. आज सदर निवडणुकीेचे निकाल जाहिर करण्यात आले आहे.

आज झालेल्या नऊ नगरपंचायतीमधील निवडणुकीचा निकाल लागला असून एकूण 153 जागा होत्या तर त्यासाठी 607 उमेदवार निवडणूकीत सहभागी होते.

  • अहेरी नगरपंचायतीतील 17 जागावर 83 उमेदवार उभे होते. यापैकी भारतीय जनता पार्टी मधील 6 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, शिवसेना येथील 2 उमेदवार व 6 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
  • सिरोंचा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 80 उमेदवार उभे होते. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना येथील 2 उमेदवार विजयी झाले. व 10 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.
  • एटापल्ली नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 82 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार तर 6 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.
  • भामरागड नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 62 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार , शिवसेना 1 तर 5 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.
  • चामोर्शी नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 60 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टी पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 उमेदवार तर 1 उमेदवार अपक्ष निवडून आलेला आहे.
  • ▪️मुलचेरा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 49 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 1 उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना पक्षाचे 4 उमेदवार तर 6 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.
  • धानोरा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 54 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 13 उमेदवार निवडून आले आहेत. तर 1 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.
  • कुरखेडा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 69 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. तर 5 उमेदवार शिवसेना पक्षाचे निवडून आले आहेत.
  • कोरची नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 68 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 6 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 उमेदवार विजयी झाले आहेत. तर 2 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here