– अस्मानी संकट आणि बीजेपीमुळे सुलतानी संकट गडचिरोलीत तयार
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस तसेच मेडीगट्टा धरणाच्या पाण्यातून होणाऱ्या विसर्गामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून याला पुर्णतहा भाजप जबाबदार आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी आज गडचिरोली येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. एकीकडे अस्मानी संकट आणि भाजपामुळे सुलतानी संकट गडचिरोली जिल्हयातील नागरिकांना सहन करावे लागत आहे अशी बोचरी टीकाही यावेळी नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले हे आज गडचिरोली जिल्हयातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हया दौऱ्यावर आले होेते. यावेळी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित होते. पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, तेलंगाणा चे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आग्रहास्तव मेडीगट्टा येथे धरण बांधण्यास तेव्हाच्या भाजप सरकारने मान्यत दिली. मात्र या धरणामुळे जिल्हयाला केवळ संटक उभे टाकले आहे. धरणातील पाण्याचा साठा वाढतो त्यावेळी धरणातून १ लाख क्युसेक्स एवढा पाणी सोडल्या जाते मात्र मेडीगट्टा धरणातून तब्बल २५ लाख क्युसेक्स एवढा पाणी सोडण्यात आले त्यामुळे अशी भयावह परिस्थिती आज उद्भवली आहे. मी विधानसभा अध्यक्ष असतांना मेडीगट्टा धरणाबाबतचा विषय आला असता आपण त्या धरणाच अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. सामेनपल्ली वासीय गाव सोडून राष्ट्रीय महामर्गाच्या कडेला आपले घर मांडुन बसलेले आहे. त्यांना आपल्या स्वगावी जाण्यास भिती वाटत आहे. सिरोंचा तालुक्यातील तब्बल २५ गावे यावेळी पाण्याखाली आली होती त्यामुळे मेडीगट्टा धरण हे सिरोंचा वासीयांना वरदान नाहीच त्यापासून नागरिकांना कोणताही फायदा नाही. एकनाथ शिंदे जेव्हा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी या भागाला भेट दिली नाही त्यांना सुरजगडमध्येच अधिक रस असल्याचा टोलाही नाना पाटोले यांनी लावला. पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यात जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून शासनने तात्काळ हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणीही यावेळी केली. सोबतच येत्या अधिवेशनामध्ये मेडीगट्टा धरणाचे प्रकरणही आम्ही लावून धरण्याचे जाहीर केले.
धरण तयार करतांना कॉंग्रेसच्या वतीने विरोध करण्यात आला होता मात्र त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच आम्ही जे भीती व्यक्त केली होती ती आता सत्यात उतरतांना दिसत आहे. केवळ तेलंगणाचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आग्रह पुर्ण करण्यासाठी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने धरणासाठी अनुमती दिली त्याचे भोग आता येथील जनतेला सोसावे लागत आहे म्हणून जिल्हयातील पुराला भाजप जबाबदार आहे असे नाना पटोले यावेळी बोलत होते.
पत्रकार परिषदेनंतर ते जिल्हाधिकारी यांच्यासोबत पुरपरिस्थितीचा आढावा घेवून चामोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेत व शेत पिकांची पाहणी करून अहेरी तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करणार होते.