– फवाारणी कर्मचाऱ्यांचे तब्बल १ कोटी १४ लाख रूपये थकले
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील हंगामी फवारणी कर्मचारी हे सहाव्या वेतनाच्या फरकाच्या थकबाकीपासून वंचित आहेत. जिल्हयात फवारणी कामगारांची वेतन थकबाकी १ कोटी १४ लाख ७३ हजार रूपये एवढी आहे. सदर थकबाकी लवकरात लवकर द्यावी अशी मागणी हिवताब प्रतिबंधक फवारणी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाअंतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी कार्यरत आहेत. त्याच्या सहाव्या वतेनाच्या थकबाकीबाबत सन २००६ ते २०११ या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील रकमेच्या थकबाकी मंजुरीचा १ कोटी १४ लाख ७३ हजार ५ रूपयांचा प्रस्ताव आरोग्य सेवा सहसंचालकांना सादर केला होता मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे हंगामी फवारणी कर्मचारी अजूनही सहाव्या वेतनाच्या फरकाच्या थकबाकीपासून वंचित आहेत. दुर्बल घटकातील कामगारांची वेतन थकबाकी लवकरात लवकर दयावी अषी मागणी प्रा. दहिवडे यांनी केली आहे.