– पूर्व आजार असलेल्या दोघांचा कोरोनाने मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 834 कोरोना तपासण्यांपैकी 118 नवीन कोरोना बाधित आढळले असून 157 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36353 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34517 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1071 झाली आहे. आज दोन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील मुरखळा येथील 56 वर्षीय महिलेचा समावेश असून ती शुगर व उच्च रक्तदाब या आजराने ग्रस्त होती. तर सावली तालुक्यातील जि.चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष निमोनिया व कोविड आजाराने ग्रस्त होती. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 765 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.95 टक्के तर मृत्यू दर 2.10 टक्के झाला आहे.
आज नवीन 118 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 25, अहेरी तालुक्यातील 04, आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 42, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 10, मुलचेरा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 01 आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 157 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 59,अहेरी तालुक्यातील 11,आरमोरी तालुक्यातील 01, भामरागड तालुक्यातील 10, चामोर्शी तालुक्यातील 32, धानोरा तालुक्यातील 05, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 04, सिरोंचा तालुक्यातील 08, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 11,आणि वडसा तालुक्यातील 11 जणाचा समावेश आहे.