गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 284 नव्या बाधितांची नोंद तर 119 कोरोनामुक्त

196

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात १०१७ कोरोना तपासण्यांपैकी २८४ नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल ११९ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३२८७६ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०८७१ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १२५३ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७५२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३. ८१ टक्के तर मृत्यू दर २. ८१ टक्के झाला आहे. आज नवीन २८४ बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील १३९अहेरी तालुक्यातील १२आरमोरी तालुक्यातील १५ भामरागड तालुक्यातील ०३ चामोर्शी तालुक्यातील ३८ धानोरा तालुक्यातील १३ एटापल्ली तालुक्यातील ०४ मुलचेरा तालुक्यातील २४कोरची तालुक्यातील ०३ कुरखेडा तालुक्यातील १४ सिरोंचा तालुक्यातील १३ आणि वडसा तालुक्यातील ०६ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ११९ रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील ६४ अहेरी तालुक्यातील ०६ आरमोरी तालुक्यातील ०२ भामरागड तालुक्यातील ०७ चामोर्शी तालुक्यातील ०५ धानोरा तालुक्यातील ४० एटापल्ली तालुक्यातील ०१ सिरोंचा तालुक्यातील ०२ कोरची तालुक्यातील ०४ मुलचेरा तालुक्यातील ०२ कुरखेडा तालुक्यातील ०१ आणि वडसा तालुक्यातील २१ जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here