गडचिरोली जिल्हयात पुन्हा धो..धो.. आज रेड तर उद्या ऑरेन्ज अलर्ट

1006

– अनेक गावांचा संपर्क तुटला, मुसळधार पावसाची एन्ट्री

The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : जिल्हयात पुन्हा धो…धो… पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हयाला काल व आज दोन दिवस रेड अलर्ट तर उद्या ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हयात ६ ऑगस्ट पासून मुसळधान पावसाने हजेरी लावत धो…धो… बसरला यामुळे अनेक जिल्हयातील अनेक ठिकाणी मुसळधारेने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक गावांचा पुन्हा एकचा संपर्क तुटलेलेला आहे. पुर आल्याने अनेक मार्गही बंद झाले आहे.
आज आलेल्या नोंदी नुसार पोर्ला परिससरात सर्वाधिक १३४.४ मीमी पाऊस पडलेला आहे. तर जिल्हयात ६० मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. १ जून पासून जिल्हयात ११९१.९ पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तर जिल्हा प्रशासनाकडून १२ वाजता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शिवनी पोटफोडी नदी पुलावर पाणी असल्याने गडचिरोली- चामोर्शी मार्ग, गोगाव नजीकच्या पाल नदी पुलावरून पाणी असल्याने गडचिरोली-आरमोरी मार्ग, आलापल्ली -ताडगांव- भामरागड (गुंडेनुर नाला, पर्लकोटा नदी, कुमरगुडा नाला, हेमलकसा नाला, कुडखेडी नाला, ताडगाव नाला, पेरमिली नाला), तळोधी- आमगांव- एटापल्ली -परसलगोंदी -गट्टा रस्ता (बांडीया नदी) , चातगांव कारवाफा- पोटेगांव- पावीमुरांडा -घोट रस्ता (पोहार नदी पोटेगांव जवळ), कसनसुर- एटापल्ली -आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला ), एटापल्ली -दुमणे रस्ता (एटापल्ली जवळील नाला ), सिरोंचा- कालेश्वरम- वारंगल- हैद्राबाद रस्ता (गोदावरी नदीच्या मोठया पुलाचे सिरोंचा गांवाकडील बाजूने पोचमार्ग वाहून गेल्यामुळे), अहेरी- बेजुरपल्ली -परसेवाडा- लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाल्यावरील लहान पुलाचे पोचमार्ग क्षतिग्रस्त झाल्याने) मार्ग बंद आहेत.

जिल्ह्यातला रेड अलर्ट असल्याने मुसळधार पावसाने नदीच्या तसेच धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका नुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

गडचिरोली-७३-८, कुरखेडा-३५-५, आरमोरी-९३-४, चामोर्शी – ६१.३, सिरोंचा २२.१, अहेरी ६४.६, एटापल्ली ३१.९, धानोरा ७१.१, कोरची ३१.८, देसाईगंज ७७.०, मुलचेरा ८८.६, भामरागड ६८.८

परिसरानुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

पोर्ला सर्वाधिक १३४-४, बामणी ७२.२, आरमोरी ९०. २, देऊळगाव ८६. ०, वैरागड १०३. ०, पिसेवडधा ९४.४, चामोर्शी १०२.०, कुनघाडा ६५.०, अहेरी १११.०, धानोरा ८७.०, चातगाव ८०.६, देसाईगंज ८६.०, शंकरपूर ६८.०, मुलचेरा ८८.६, भामरागड ७४.०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here