– २० मार्च रोजी शहरातील एस आर स्टार डान्स स्टुडिओ तिरुपती कॉम्प्लेक्स मध्ये आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मागास, नक्षल प्रभावित आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरीही गडचिरोली जिल्ह्यात मात्र टॅलेंट ची कमी नाही. कमी आहे ते फक्त स्टेजची (संधी ) ही बाब लक्षात येताच ड्रीम टाउन फिल्म स्टुडिओ तळेगाव (पुणे) च्या वतीने गडचिरोली जिल्हा वासियांना सुवर्णसंधी घेऊन आली आहे. रेसिंग स्टार डान्स आणि मॉडेलिंग नॅशनल लेव्हल टीव्ही शो कॉम्पिटिशनचे ऑडिशन गडचिरोलीत घेण्यात येणार आहे आहे. यात किड्स, टिन, मिस्टर, मिस, मिसेस अशा वेगवेगळ्या कॅटेगिरीत आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. सदर ऑडिशन गडचिरोली शहरातील एस आर स्टार डान्स स्टुडिओ तिरुपती कॉम्प्लेक्स येथे २० मार्च रोजी सकाळी १० ते ४ वाजता पर्यंत घेण्यात येणार आहे. तरी यात गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त वासियांनी संधीचा लाभ असे आवाहन करण्यात आले आहे. ऍडिशन साठी नाव नोंदणी सुरु असून अधिक माहितीसाठी व नाव नोंदविण्यासाठी 8275677993, 9579554412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.