– हजारोंच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोबर : जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांकरिता आष्टी येथे भव्य चक्काजाम आंदोलन आज २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी विविध मागण्यासंदर्भात तहसीलदार चामोर्शी यांनी निवेदन देण्यात आले. चक्काजाम आंदोलनाला हजारोंच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील काही वर्षापासून सुरजागड लोह खदान सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील वनसंपत्तीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. सुरजागड प्रकल्पाकरिता चालणाऱ्या गाडयांमुळे जिल्हयातील नागरिकांना व वाटसरूंना नाहक त्रास सहन करावा लागत असून यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्हयातील कोनसरी प्रकल्प सुरू करून उद्योग निर्मीती करण्याचे तत्कालीन सरकारने आश्वासन दिले मात्र हे प्रकल्प अद्यापही सुरू झाले नाही. कोनसरी प्रकल्प सुरू झाल्या शिवाय जिल्ह्यातील सुरजागड चा कच्चा माल परराज्यात किंवा जिल्ह्याबाहेर नेऊ व प्रकल्प सुरू होत पर्यंत कच्चा माल
जिल्ह्यातच साठवून ठेवण्यात यावे, सुरजागड खदाणीत चालणाऱ्या मालगाड्याने प्रवाशांना व स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ही वाहतूक दिवसा ऐवजी रात्री ७ पासून सकाळी ७ पर्यंत सुरू करण्यात यावी, सुरजागड प्रकल्पातील प्रभावित १३ गावाची जनसुनावणी जिल्हास्तरावर न घेता तालुका स्तरावर एटापल्ली येथे घेण्यात यावी, कोनसरी प्रकल्पात आणि सूरजागड च्या खदानित स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन जागा आरक्षित करण्यात याव्या, कोनसरी येथील प्रकल्पग्रस्त व गावातील स्थानिक युवकांना रोजगारांसाठी प्राधान्य देण्यात यावे, परवान्या पेक्षा अधिकचे उत्खनन त्वरित थांबवण्यात यावे, कोनसरी येथे CCTV असला चेक नाका बसवण्यात यावे, सुरजागड प्रकल्पात चालत असलेल्या मालगाड्या ने झालेल्या अपघाताची चौकशी करून संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, व मृतांच्या परिवारास कायदेशीर मोबदला देण्यात यावे व परिवारातील सदस्यास कामावर घ्यावे, आष्टी-आलापल्ली- सिरोंचा महामार्ग लवकरात लवकर तयार करन्यात यावे, खदाणीतून निघणाऱ्या गाळी मुळे सभोवतालच्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांचे सर्वेक्षण करून निकषानुसार मदत जाहीर करण्यात यावी, उत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीची NGT आणि प्रदूषण महामंडळा कडून चौकशी करण्यात यावी अश्या मागण्यांसंदर्भात तहसिलदार चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतिश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पंदिलवार, जिल्हा महासचिव नीलकंठ निखाडे, प्रमोद भगत, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, शामराव चापले, एटापल्ली ता.अध्यक्ष रमेश गंपावर, वामनराव सावसाकडे, संजय पंदिलवार, अनिल कोठारे, निजान पेंदाम, मोहन नामेवार, लोकेश गावडे, वसंत राऊत, दिलीप घोडाम, रमेश यादव मेश्राम, विश्वास बोंमकंटीवार, नितीन खिरटकर, मुन्ना गोंगल, मिलिंद खोब्रागडे, नंदू नरोटे, अब्दुल पंजवाणी, भाग्यवान पिपरे, मिलिंद खोब्रागडे, रमेश चौधरी, पिंकू बावणे, अरुण मडावी, सुभाष कोठारे, विनोद मडावी, गोपाल कवीराज, नितेश राठोड, राबिन पाल, सुवर्णा येमुलवार, रुपेश टिकले, रजनी आत्राम, बाळू कीनेकर, महेश जिलेवार, हरबाजी मोरे, माधुरी कोहळे, कविता भगत, माजिद स्ययद, जावेद खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.