गडचिरोली जिल्हा पोलिस भरती : मैदानी चाचणीच्या तारखेत बदल

3699

The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑगस्ट : गडचिरोली जिल्हा पोलिस भरती – २०२२ मधील शारीरिक चाचणी करिता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी अनुक्रमे ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून नवीन तारखेनुसार अनुक्रमे ६, ७, व ८ सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याबाबत सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शारीरिक चाचणी करिता पात्र उमेदवारांना सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक, PDF डाउनलोड करा –

शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांसाठी सुचना

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची मैदाणी चाचणी ०५,०६ तसेच ०७ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार होती परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे नविन तारीख जाहिर करण्यात येत असुन ०६,०७ तसेच ०८ सप्टेंबर २०२२ रोजी पात्र उमेदवारांची मैदाणी चाचणी घेण्यात येणार आहे.
१२ जुलै २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची अंतीम यादी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेत स्थळावर तसेच फेसबुक, व्टिटर यामाध्यमातुन प्रसारीत करण्यात आलेली आहे.
https://www.gadchirolipolice.gov.in/files/Result/8.pdf

या अंतीम यादी मधील पात्र उमेदवारांना बैठक क्रमांकानुसार शारीरिक चाचणी करीता बोलावण्यात येत आहे. ४. सदर उमेदवारांनी आपआपल्या तारखेनुसार एम. टी. मेन गेट पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सकाळी ०४.३० वा. हजर राहावे. सकाळी ०५:०० वा. नंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिल्या जाणार नाही. ५. उमेदवारांनी शारीरिक चाचणी करीता येताना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत आणावे तसेच स्वता:चे पासपोर्ट साईज ०५ छायाचित्र (फोटो) आणावे.
उमेदवारांना मोबाईल तसेच ईलेक्ट्रॉनीक साधन आत घेवुन जाण्यास परवानगी नाही.
उमेदवारांनी स्वता:चे पिण्याचे पाणी तसेच अल्पोपहार स्वता: घेवुन यावे, दुर्गम भागातील उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरीता निर्धारीत वेळेत पोहचण्यासाठी अगोदर प्रवास करुन यावे, उमेदवारांनी शारीरिक चाचणी करीता येताना खाली दिलेल्या यादितील कागदपत्र सोबत आणावे.

कागदपत्रे

१. जन्मदाखला
२. शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी) किंवा शाळा शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
३ ७ वी किंवा १० वी पास/ १२ वी पास / पदवी / पदव्युतर चे शैक्षणीक प्रमाणपत्र व माजी सैनिक यांचेसाठी सैनिक बोर्ड प्रमाणपत्र.
४. जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र
५. जात वैधता प्रमाणपत्र,
६. महिला/माजी सैनिक / खेळाडु / होमगार्ड/ प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त/ अंशकालीन कर्मचारी / पोलीस पाल्य / अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
७. संगणक हाताळणीबाबतचे एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र
८. हलकी वाहन चालविण्याचा परवाना
९. आधार कार्ड / पॅन कार्ड / निवडणुक कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तसेच पोलीस भरती संदर्भात ईतर सर्व कागदपत्र.
१०. सर्व उमेदवारांनी सर्व कागदपत्र शारीरिक चाचणी चे दिवशी हजर करणे बंधनकारक आहे याबबत नंतर कोणतीही संधी मिळणार नाही.
११. शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांनी पोलीस भरती बाबत सुचनांचे अवलोकन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेत स्थळ, वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात तसेच लिंक चे सदर

शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांनी पोलीस भरती बाबत सुचनापत्र डाऊनलोड करून अवलोकन करा

https://www.gadchirolipolice.gov.in/files/Recruitment/1.pdf
१२. उमेदवारांना वैद्यकीय समस्या उद्भवल्यास डॉक्टर यांच्या सल्यानुसार शारीरिक चाचणीमध्ये भाग घ्यावा
१३. उमेदवारांना मैदानावर आक्षेप असल्यास त्याबाबत पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचा निर्णय अंतीम असेल…
१४. उमेदवारांनी शारीरिक चाचणी करीता येताना सोबत ब्लू बॉल पेन ठेवावा.
१५. उमेदवारांनी स्वता: सोबत आणलेल्या सामानाची जबाबदारी त्याची स्वता:ची राहील.
१६. उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला बळी पडु नये, कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमीष देत असेल तर समाधान कक्ष, गडचिरोली यांचे मोबाईल क – ८८०६३१२१०० तसचे उपविभागीय कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके येथे संपर्क साधावा.
१७. उमेदवारांना कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास समाधान कक्ष, गडचिरोली मोबाईल क – ८८०६३१२१०० यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here