गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – 2022 शारीरिक चाचणी गुणसुची जाहीर

2555

– काही आक्षेप असल्यास संपर्क करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १५ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ (Gadchiroli police Recruitment 2022) करिता शारीरिक चाचणी नुकतीच ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान पार पडली होती. या चाचणीची गुणसूची जाहीर करण्यात आली असून सदर यादीमध्ये काही आक्षेप असल्यास १७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता पर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालय , गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक – 8806312100 यावर किंवा उपविभागीय कार्यालय / पोस्टे/ उपपोस्टे/पोमके येथे व्यक्तिगत आक्षेप नोंदवू शकता असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तरसूची पहा

१९ जून २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – २०२२ ची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर १२ जुलै २०२२ रोजी शारिरीक चाचणी करीता पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. त्याआधारे ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – २०२२ मधील शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

त्यावेळेस उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्रे NCC कागदपत्रे व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. त्याआधारे मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण सदर यादी मध्ये देण्यात आले आहे.

ज्या उमेदवार यांच्या नावासमोर (#) हे चिन्ह आहे त्यांच्या एकुण गुणांमध्ये NCC चे मार्क्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
उमेदवारांनी त्यांची सर्व माहिती जसे की, रोल नंबर, संपुर्ण नाव, लिंग, जन्मदिनांक शैक्षणिक माहिती, प्रवर्ग, समांतर आरक्षण, लेखी परीक्षेचे गुण, शारिरीक चाचणीचे गुण व एकुण गुण तपासुन घेणे तसेच आक्षेप असल्यास नोंदवावे त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असेल तर १७ सप्टेंबर २०२२ रोजी चे दुपारी १२.०० वा. पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर किंवा उपविभागीय कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके येथे व्यक्तीगत आक्षेप नोंदवु शकतात.

उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमकें येथे संपर्क साधावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here