The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९६.०० टक्के लागला असून यात मुलींनी बाजी मारली आहे.
जिल्ह्यात एकूण १२९१८ मुलांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यापैकी १२७२१ जण प्रत्यक्ष परीक्षेत बसले. यात ६४८९ विद्यार्थी व ६२३२ विद्यार्थिनी आहेत. परिक्षेला बसलेल्या पैकी १२२१३ जण उत्तीर्ण झाले. यात ६१८८ (९५.३६%) विद्यार्थी व ६०२५ (९७.६७%) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वीचा एकूण निकाल ९६.०० टक्के लागला आहे.