The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : जिल्हयात आज ४६९ कोरोना तपासण्यां करण्यात आल्या त्यापैकी १२ नवीन कोरोना बाधितांची भर पडली असून १० जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३८००७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या३७१४६ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८४ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२२ टक्के तर मृत्यू दर २.०४ टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०३,चामोर्शी तालुक्यातील ०३,व धानोरा तालुक्यातील ०२, मुलचेरा तालुक्यातील ०१, व कोरची तालुक्यातील ०३ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०२, अहेरी तालुक्यातील ०१, चामोर्शी तालुक्यातील ०४, कुरखेडा तालुक्यातील ०१, व धानोरा तालुक्यातील ०२, जणाचा समावेश आहे.