– जिल्हा प्रशासनाने जारी केले आदेश
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाभरात मास्क वापरने बंधनकारक केले आहे. मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात यावे असे स्पष्ट आदेश मंगळवार १४ जून रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय मीणा यांनी जारी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती मात्र गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे कोरोना साथरोग प्रादुर्भाव, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय व खासगी व औद्योगिक अस्थापनानंमध्ये तसेच सार्वजनिक संस्थांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सदर स्थळी बिना मास्क आढळल्यास नियमांचे कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीस जबाबदार धरून ५०० रुपये दंड वसूल करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय मीणा यांनी जारी केले आहे.