The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा प्रशासननेही १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, संस्था येथे नियोजित वेळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

#गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न#सामूहिक_राष्ट्रगीत_गायन pic.twitter.com/TmMKJO1hJn
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) August 17, 2022