THE गडविश्व
गडचिरोली : देशभरात आज पासून १५ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सदर लसीकरणाचे अधिकृत उदघाटन करण्यात आले. यावेळी मुलांकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
१५ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुली यांना कोविड लसीकरण देण्याची मोहीम सुरू होत असून पात्र मुला- मुलींनी लसीकरण करून संरक्षीत व्हावे असे आवाहन.आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनी उत्साही प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यात एकूण ५५५२२ इतके संभाव्य १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींना लसीकरण करून कोरोना या रोगाविरुद्ध लढण्यास सक्षम करण्यात येणार आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनीकरीता आजपासून जिल्ह्यातील काही शाळा आणि सर्व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध असणार आहे.
या वयोगटाकरिता भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस ही देण्यात येणार असून .लस मिळण्याकरिता पात्र मुला मुलींनी ऑनलाईन नोंदणी किंवा स्पॉट रेजिस्ट्रेशन करून लाभ घेऊ शकतात. याबाबत अधिक माहिती ही selfregistartion.cowin.gov.in वा आरोग्यसेतू अथवा उमंग या ऍप्प वरून करता येईल.
15 to 18 years #vaccination inaugurated officially in #gadchiroli district today.Enthusiastic response is getting by adolescent young age group#गडचिरोली जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचे आज अधिकृत उद्घाटन करण्यात आले. पौगंडावस्थेतील तरुण वयोगटाकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे pic.twitter.com/WriJMBQZpb
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) January 3, 2022
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाला गडचिरोली जिल्ह्यात सुरुवात. यावेळी उत्साही तरुणांचे टिपलेली काही छायाचित्र.#vaccination #Gadchiroli #CovidVaccine @CMOMaharashtra @rajeshtope11 @MahaDGIPR @InfoVidarbha pic.twitter.com/8oPxY2fQ4O
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) January 3, 2022