– सर्व यंत्रणांना हाय अलर्ट, कोणीही विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १० जुलै : जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय मीना यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या असून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला आहे. तसेच पुढील टन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या दसरम्यान कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, मुसळधार पावसा दरम्यान विविध ठिकाणचे नाले पुलावरून पाणी वाहत असतांना कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दसरम्यान काल ९ जुलै रोजी रात्रोच्या सुमारास पेरमिली नाल्यावरून ट्रक वाहून गेला यात तिघांचा मृत्यू झाला.