– निवडणूका लांबणीवर
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ काल २० मार्च रोजी संपल्याने आज २१ मार्च पासून जिल्हा परिषदेच्या कारभाराची सुत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हातात राहणार आहे.
राज्यातील निवडणूका कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडल्या आहेत. तर कार्यकाळ संपण्यापुर्वी निवडणूका घेणे अपेक्षित होते मात्र तसे होवू शकले नाही. तसेच जिल्हयातील पंचायत समितीचा कार्यकाळही १३ मार्च रोजी संपला यामुळे पंचायत समितीवरही प्रशासक म्हणून बीडीओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर लोकप्रतिनिधींना एकही जास्तीचा दिवस पदावर राहता येत नाही.