गडचिरोली : तीन नक्षल समर्थकांना अटक, ८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

2069

– नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

The गडविश्व
गडचिरोली, २९ जुलै : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस (gadchiroli police) दलास मोठे यश आले आहे. तीन नक्षल (naxal) समर्थकांना नक्षली बॅनर (naxal banner) लावतांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. पवनकुमार फकीरचंद उईके रा. कमलापूर, ता. अहेरी जि. गडचिरोली (kamlapur-aheri-gadchiroli), प्रफुल देवानंद बट रा. वरूड ता. मारेगाव जि. यवतमाळ (varud-maregao-yavatmal), अनिल गोकुळदास बट रा. कमलापूर ता. अहेरी जि. गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आज शुक्रवार २९ जुलै रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचेसमोर हजर केले असता न्यायालयाने (gdchiroli cort) ०८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी पवनकुमार फकीरचंद उईके हा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर तर प्रफुल देवानंद बट हा रुग्णवाहिका चालक, अनिल गोकुळदास बट हा धानाचा व्यापारी असल्याचे कळते.
नक्षल्यांकडून २८ जुलै ते ०३ ऑगस्ट (28 july-3 august) या दरम्यान नक्षल शहीद सप्ताह (shahid saptah) पाळण्यात येतो. या दरम्यान नक्षली शासन विरोधी योजना आखुन रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा (sp ankit goyal) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा.(samir shekh), अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा.(somay munde), अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा (anuj tare). यांचे नेतृत्वात नक्षल्यांचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे.
पोलीस उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीत पोलीस अधीक्षक सा. यांना मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे रेपनपल्ली परिसरात उपपोस्टे रेपनपल्लीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना काल गुरुवार २८ जुलै रोजीचे रात्रो दरम्यान उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील कमलापूर- दामरंचा (kamlapur-damracha) जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पवनकुमार फकीरचंद उईके रा. कमलापूर, ता. अहेरी जि. गडचिरोली (pawankumar uikey) , प्रफुल देवानंद बट रा. वरूड ता. मारेगाव जि. यवतमाळ(praful bat), अनिल गोकुळदास बट रा. कमलापूर ता. अहेरी जि. गडचिरोली (gokuldas bat) हे २८ जुलै नक्षल शहीद सप्ताहादरम्यान आजुबाजुच्या परिसरात दहशत निर्माण करण्याकरीता भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या भा.क.पा. माओवादी संघटनेचे नक्षल बॅनर लावून शासनाविरुध्द कट रचतांना मिळून आले. याप्रकरणी आरोपीविरुध्द उपपोस्टे रेपनपल्ली येथे अ.प.क्र ०२ / २०२२ कलम १२० (ब), ३४ भादंवि सहकलम बेकायदेशीर प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम १०,१३,२०, मपोका कलम १३५ अन्वये २८/०७/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपीना काल २८ जुलै रोजी रात्रो उशिरापर्यंत अटक करण्यात आली असुन आज २९ जुलै २०२२ रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचेसमोर हजर केले असता न्यायालयाने (cort) ०८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोलीस कोठडी (police custidy) सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here