– गडचिरोली परिक्षेत्रात नियुक्ती
The गडविश्व
गडचिरोली : नक्षलविरोधात उत्कृष्ट व दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात येते. त्यानुसार विविध जिल्ह्यातील १० पोलिस अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात आली असून त्यांना गडचिरोली परिक्षेत्रात नियुक्ती देण्यात आली आहे.
वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नि:शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पुंजा मंडलिक, राजेश ज्ञानोबा खांडवे, अमोल नानासाहेब फडतरे यांची पोलीस निरीक्षक पदावर तर पोलीस उप निरीक्षक अशोक संजय भापकर (सध्याची नियुक्ती सातारा), कल्पेश बाबाराव खारोडे (सध्याची नियुक्ती पुणे शहर ), ज्ञानेश्वर तुकाराम गाभाले , सुदर्शन सुरेश काटकर, दिनेश साहेबराव गावंडे, बाळासाहेब जनार्धन जाधव यांची सहायक पोलीस निरीक्षक पदावर तसेच सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गोपाल मनिराम उसेंडी यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वेगवर्धित पदोन्नती प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

वेगवर्धित पदोन्नती मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी यांचे गडचिरोली पोलीस दलातर्फे हार्दिक अभिनंदन !!! #GadchiroliPolice #policeofficer #welldone #Promotion #Congratulations #Policedadalorakhidki pic.twitter.com/dn5BJKz66z
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) February 17, 2022