गडचिरोली : दोन वाघांच्या लढाईत ‘त्या’ वाघाचा मृत्यू

326

– शवविच्छेदन अहवालातून झाले स्पष्ट

THE गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील काटली येथे आज 6 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हेत. मात्र आता शवविच्छेदन अहवालानुसार दोन वाघांच्या लढाईत‘त्या’ वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे वडसाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण यांनी ‘THE गडविश्व’ शी बोलतांना सांगितले.
काल 5 जानेवारी रोजी देसाईगंज वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील काटली येथील तलाव शेजारी वाघ असल्याचे गावातील नागरिकांना निदर्शनास आले होते. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाचे पथक, कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून वाघाच्या हालचालीलवर पाळत ठेवली होती. दरम्यान काल सांयकाळच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. आज 6 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास वनविभागाचे पथक, कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मौका पंचनामा करून मृत वाघ पोर्ला येथील वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून उपवनसंरक्षक वडसा विभागीय वन अधिकारी, गडचिरोली वनवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वडसा, वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला, मानद वन्यजीव रक्षक गडचिरोली यांच्या उपस्थितीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे, गडचिरोलीचे पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. लेखमी व पोर्लाचे पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामटेके यांच्या चमु यांना मृत वाघाचे शवविच्छेदन करतांना मानेवर व पायाला दुसऱ्या वाघाच्या चाव्यांच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे सदर वाघाचा मृत्यू हा दोन वाघाच्या लढाईत झाला असे स्पष्ट झाले. सदर मृत वाघ अंदाजे 3 ते 4 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पुर्ण करून मृत वाघाला दहन करण्यात आले असे वडसाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण यांनी सांगितले.

काटली येथील गावतलाव परिसरात वाघ असल्याची माहिती काल 5 जानेवारी रोजी मिळाली. दरम्यान वाघाच्या हालचालीवर वनविभागाच्या पथकाडून पाळत ठेवण्यात आली. सायंकाळच्या सुमारास सदर वाघाचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली. आज 6 जानेवारी रोजी मृत वाघाचे शवविच्छेदन करतांना मानेवर व पायावर दुसऱ्या वाघाच्या चाच्याच्या जखमा दिसनू आल्या. त्यामुळे ‘त्या’ वाघाचा मृत्यु दोन वाघांच्या लढाईत लढाईत झाला हे स्पष्ट झाले.
-चव्हाण
सहाय्यक वनसंरक्षक, देसाईगंज वडसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here